माध्यम प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांसाठी
ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक
नांदेड, दि. 26
:- आगामी लोकसभा व विधानसभा
सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅट या नवीन मशीनचा वापर मतदानासाठी करण्यात
येणार आहे. या नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्राबाबत नांदेड
जिल्ह्यात जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे
उपस्थितीत माध्यम प्रतिनिधी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी
बचत भवन येथे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनद्वारे कसे मतदान केले जाते याचे
प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले.
या मशीनच्या वापरामुळे मतदारांनी ज्या उमेदवाराला मत दिले
त्याचा अनुक्रमांक, त्यांचे नाव व चिन्ह ही माहिती सात सेंकदापर्यंत मतदाराला
दिसणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास पडले आहे याची
खात्री करुन घेता येणार आहे. यामुळे
कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी
पत्रकारांना यंत्राबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी माध्यम प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम,
व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान करुन माहिती घेतली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक)
दिपाली मोतियळे, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, जिल्हा
माहिती अधिकारी अनिल आलूरकर, नायब तहसिलदार अश्विनी जगताप, तहसील कार्यालयाचे
ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन जनजागृती मोहिमेचे पथक तसेच विविध माध्यमांचे
प्रतिनिधी, संपादक, पत्रकार व कर्मचारी उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment