अन्न पदार्थांची दक्षता घ्यावी
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
नांदेड, दि. 2 :- जिल्ह्यातील
नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न पदार्थ, मिठाई मिळावी म्हणून अन्न व औषध प्रशासनाने
दिवाळी निमित्त मोहिम हाती घेतली आहे. अन्न पदार्थांच्या भेसळीबाबत खात्रीशीर
माहिती नागरिकांनी नि:शुल्क टोल क्रमांक 1800 222 365 वर तक्रार नोंदवावी, असे
आवाहन नांदेड अन्न व औषध प्रशासनाचे पदावधित अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न)
यांनी केले आहे.
नांदेड शहर व
जिल्ह्यातील अन्न व्यावसाईक आस्थापनाची तपासणी करण्यात येत असून अन्न
व्यावसायिकांनी दुषित, अस्वच्छ जागी ठेवलेले खराब अन्न पदार्थ ग्राहकांना विक्री
करु नये. मिठाई व दुग्धजन्य पदार्थ विशिष्ट नियंत्रीत तापमाणात ठेवावीत. खाद्यरंग
प्रमाणापेक्षा जास्त वापरु नये. तसेच अन्न पदार्थ जाकुण ठेवण्याचे निर्देशही
देण्यात आले आहेत.
अन्न
सुरक्षा अधिकाऱ्यांनी खाद्यतेल उत्पादकांची तपासणी केली असून चांगले खाद्यतेल
उत्पादकाने ग्राहकाला विक्री करण्याबाबत सुचित केले आहे. तसेच मिठाई, खाद्यतेल,
आटा, रवा, मैदा, दुधाचे नमुणे घेण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. या अन्न
पदार्थाच्या तपासणी अहवालाची पूर्ण कार्यवाही घेण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी
पत्रकात म्हटले आहे.
00000
No comments:
Post a Comment