दिव्यांग मतदार नोंदणीसाठी सहकार्य करावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 10 :- दिव्यांग मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी जास्तीतजास्त
दिव्यांगांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दिव्यांग मतदारांची नोंदणी
वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. त्यावेळी
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
भारत
निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदार
नोंदणीवर विशेष भर दिला आहे. नवीन नाव नोंदणी बरोबरच यापुर्वीच ज्याची नावे मतदार
यादीत आहेत ती नावे ध्वजांकित केली जात आहेत. जेणे करुन मतदानाच्या दिवशी दिव्यांग
मतदारांना आवश्यक सुविधा पुरविणे शक्य होईल, असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.
उपजिल्हा
निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयेळे यांनी विविध शासकीय कार्यालयात कार्यरत
कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी तपासणीसाठी संबंधित आस्थापनाकडून याद्या मागविल्या आहेत.
शासकीय कार्यालयाच्या एकत्रीत प्रयत्नांतून जास्तीतजास्त दिव्यांगांकडे पोहचणे
शक्य असल्याने जिल्हा परिषद, महानगरपालिका, महसूल, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य
विभाग, भारत स्काऊड गाइड आदी विभागाचे सहकार्य निवडणूक विभागाने घेतले आहे, असे
त्यांनी सांगितले.
जास्तीतजास्त दिव्यांगांची
नोंद व्हावी यासाठी संभाव्य उपाय योजनांची तसेच दिव्यांग स्वयंसेवी संस्थांची या
कामात कशी मदत घेत येईल याबाबत बैठकीत चर्चा झाली. बैठकीस उपविभागीय अधिकारी
प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment