Monday, October 1, 2018


जागतिक जेष्ठ नागरिक दिन व सप्ताहानिमित्त

तपासणी व उपचार शिबीर

नांदेड दि. 1 :- श्री. गुरु गोबिंद सिंघाजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जेष्ठ नागरिकांसाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ६० वर्ष वयोगटावरील सर्व स्त्री पुरुष जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले.

या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड शहर शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के, तसेच उत्तर मराठवाडा जेष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष अशोक तेरकर, महासंघाचे सचिव भागीरथी बच्चेवार, कोषाध्यक्ष जयवंतराव सोमवाड, सामाजिक कार्यकर्ते डॉ. तेलंग  हे उपस्थित होते.

सदरील शिबिरात एकूण २१२ जेष्ठ नागरिकांचे महुमेह, उच्चरक्तदाब, मोतीबिंदू, व मौखिक आरोग्य, यासाठी तपासणी करण्यात आली त्यापैकी ६९ जेष्ठ नागरिकांची ईसीजी काढण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, एनसीडी कार्यक्रमाचे नोडल ऑफीसर एच. आर. गुंटूरकर, डॉ हनुमंत पाटील तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   या कार्यक्रमाच प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी.एन. हजारी व आभार प्रदर्शन                डॉ. एच. के. साखरे, यांनी केले.

****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...