Friday, September 21, 2018


धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी
अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार 
नांदेड, दि. 21 :- धर्माबाद तालुक्‍यातील पाटोदा थडी, शेळगाव थडी व मौ. माष्‍टी ही गावे धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या गणामध्‍ये समावेश करुन तेथील शेतकऱ्यांची नावे मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट करुन वरील गावांचा समावेश केलेल्‍या गणांची सुधारीत शेतकरी मतदार यादी शनिवार 22 सप्टेंबर 2018 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड व सचिव, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती धर्माबाद यांच्‍या कार्यालयातील दर्शनीय भागातील सुचना फलकावर प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे.
मा. राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्‍या आदेशाने व उच्‍च न्‍यायालय औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र. 6942 / 2018 मध्‍ये दिलेल्‍या निर्णयाप्रमाणे धर्माबाद तालुक्‍यातील पाटोदा थडी, शेळगाव थडी व मौ. माष्‍टी ही गावे धर्माबाद कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या गणामध्‍ये समावेश करुन तेथील शेतकऱ्यांची नावे मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट करुन वरील गावांचा समावेश केलेल्‍या गणांची सुधारीत शेतकरी मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍याबाबत आदेशीत केले होते.
त्‍यानुसार वरील तीन्‍ही गावांचा नजीकच्‍या गणामध्‍ये म्‍हणजेच पाटोदा थडी हे गाव गण क्र.10 पाटोदा (बु) मध्‍ये मौ. माष्‍टी गण क्र.11 अतकुर मध्‍ये व शेळगाव थडी हे गाव गण क्र. 15 आलुर समावेश करुन सुधारीत प्रारुप मतदार यादी 29 ऑगस्ट 2018 रोजी प्रकाशीत करुन वरील तीन गणांच्‍या प्रारुप मतदार यादीवर हरकती मागविल्‍या होत्‍या. त्‍यानुषंगाने आलेल्‍या हरकतीवर जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास)  तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी सुनावणी घेऊन दि. 17 सप्टेंबर 2018 रोजी निर्णय दिला आहे.
महाराष्‍ट्र कृषि उत्‍पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 60 व त्‍या खालील महाराष्‍ट्र कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम सुधारणा 2017 चे नियम 6 ते 10 मधील तरतुदीनुसार तसेच मा. उच्‍च न्‍यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्‍या आदेशाप्रमाणे वरील तिन्‍ही गावांचा समावेश केलेल्‍या गणांची अंतीम शेतकरी मतदार यादी  धर्माबाद कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती निवडणूक- 2018 करिता शनिवार 22 सप्टेंबर 2018 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था नांदेड व सचिव, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती धर्माबाद यांच्‍या कार्यालयातील दर्शनीय भागातील सुचना फलकावर प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे, असे जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...