कापूस, सोयाबीन पिकासाठी कृषि संदेश
नांदेड दि. 27 :- जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकासाठी किड व
रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे
किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
कापूस पिकावरील कामगंध सापळ्यातील लुर बदलावे आणि असीफेट 50
प्लस इमिडाक्लोप्रीड 1.8 एसपी 20 मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल 9.3 प्लस 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्वरीत फवारावे. उशीरा पेरणी झालेल्या सोयाबीन
पिकावर खोडमाशी, उंटअळी तसेच चक्रीभुंग्यासाठी थायमिथोक्झॅम 12.6 प्लस लॅमडा
सॅहलोथ्रीन 9.5 झेड सी 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन
उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment