Sunday, July 8, 2018


समाजातील एकोपा टिकून
राहण्याच्या दृष्टिकोणातून कार्य करावे
- न्यायमूर्ती सी. एल. थूल

नांदेड, दि. 8 :- समाजातील परस्परांविषयी एकोपा टिकून राहण्याच्या दृष्टिकोणातून दक्ष राहून कार्य करावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (विधी) न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी दिले. येथील मिनी सह्याद्री विश्रामगृहात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व नागरी हक्क संरक्षण कायदाबाबत बैठक न्या. थूल यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, समाज कल्याणचे  सहाय्यक आयुक्त भगवान वीर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात मागील पाच वर्षात दाखल झालेले गुन्हे, पोलीस तपासावरील गुन्हे यांचा आढावा घेऊन न्या. थूल म्हणाले, जिल्ह्यातील कोणत्याही विभागांमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व नागरी हक्क संरक्षण कायद्यांतर्गत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत अशा सर्व विभागांवर विशेष लक्ष द्यावे. तसेच जिल्ह्यामध्ये कोणतीही जातीय दंगल घडू नये यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.  
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टिने जातीय अनुचित प्रकार टाळण्यासाठी दक्ष असल्याचे सांगितले.
यावेळी अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व नागरी हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्ह्यात 1 जानेवारी 2013 ते जून 2018 अखेर एकुण दाखल गुन्हे-445, पोलीस तपासावर- 41, पोलीस फायनल- 58, न्यायालयात प्रलंबित- 185, शिक्षा झालेले- 7, निर्दोष सुटलेले- 154, अर्थसहाय्य दिलेले प्रकरण- 343, अर्थसहाय्य रक्कम लाखात 217.20 अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री. वीर यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.  
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...