Saturday, July 7, 2018


मुखेड येथे 38 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही2017       /
            नांदेड, दि. 7 :- तंबाखू नियंत्रण कायदा म्हणजेच कोटपा कायदा २००३ चे उल्लंघन करणे हा दंडनीय गुन्हा आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एच.आर.गुंटूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने मुखेड येथे 6 जुलै रोजी अचानक धाडी टाकण्यात आल्या. या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने कायदतील तरतुदीनुसार या पथकामार्फत 38 तंबाखू विक्रेते यांचेकडून 17 हजार 300 रुपये दंड आकारण्यात आला.
पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना तिवारी, समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे तथा सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तसेच मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. शंकपाळे, डॉ. शेख समीर तथा शहनवाझ शेख व स्थानिक पोलीस सुभाष राठोड तथा चातरवाड, पांडागळे आदी होते.
जिल्ह्यात कोटपा कायदाचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...