Tuesday, June 12, 2018


शासकीय ईबीसी वसतीगृहातील
प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु
            नांदेड, दि. 12 :- शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह मालेगाव रोड तथागत नगर नांदेड येथे सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 8 वी, 11 वी, पदवी प्रथम वर्षे कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नूतन प्रवेश तसेच वर्ग 9 वी, 10 वी, 12 वी, पदवी द्वितीय आणि तृतीय व पदवीत्तर द्वितीय वर्षे पुर्नप्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज शनिवार 30 जून 2018 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून मागविण्यात येत आहेत.
अर्जासोबत वार्षिक परीक्षेच गुणपत्रक सन 2017-18 या वर्षाचे वार्षिक उत्पन्नाचे तहसिलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्राच्या सत्यप्रती साक्षांकित करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयीन वेळेत 30 जून पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयात मिळतील. या कालावधीत संपूर्णपणे भरलेले अर्ज कागदपत्रांसह स्विकारले जाणार आहेत.
प्रवेश अर्जाची किंमत 10 रुपये असून अर्ज विद्यार्थ्यांने समक्ष घेऊन जावेत. विद्यार्थ्यांची प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमीत सुरु होईल. वसतीगृहात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 500 रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. शासनाकडून वसतीगृहास निवासाची, भोजनाची विनामुल्य सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्‍यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव आहेत. या वसतीगृहात प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 जून 2018 ही असून या तारखेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. चूक किंवा अपूर्ण माहितीचे अर्ज तसेच कागदपत्रांची पूर्तता न केलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची संबंधीत विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन गृहप्रमुख शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी केले आहे.
वसतीगृहातील प्रवेशासाठी एकूण 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे.
माध्यमिक विभाग ( 8, 9 , 10 वी )- 40 जागा, पूर्नप्रवेशाच्या जागा- 24, नुतन प्रवेशाची विद्यार्थी संख्या- 14, खुला संवर्गासाठी- 11, राखीव- 3.
उच्च माध्यमिक विभाग ( 11 12 वी )- 40 जागा, पूर्नप्रवेशाच्या जागा- 27, नुतन प्रवेशाची विद्यार्थी संख्या- 11, खुला संवर्गासाठी- 9, राखीव- 2.
वरिष्ठ महाविद्यालय विभाग ( पदवी / पदव्युत्तर )- 20 जागा, पूर्नप्रवेशाच्या जागा- 24, नुतन प्रवेशाची विद्यार्थी संख्या- निरंक, खुला संवर्गासाठी- निरंक, राखीव- निरंक.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...