मधमाशा पालन उद्योग वाढीसाठी
प्रशिक्षण
नांदेड दि. 21 :- जिल्ह्यात मधमाशा पालन उद्योगात वाढ होऊन शेतकऱ्यांना मधमाशा
पालन उद्योगाचे महत्व अवगत
व्हावे व परागीभवनासाठी जिल्हा कृषी कार्यालयामार्फत आत्मा योजनेअंतर्गत मधमाशा
पालन उद्योगाकरीता प्रात्यक्षिकासाठी निधी प्राप्त झाला
आहे. या निधीतून शेतकऱ्यांना सातेरी / मेलीफेरा मधमाशाची प्रात्यक्षिकासाठी मधपेटी
उपलब्ध करुन मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात
येणार आहे. या योजनेचा
लाभ घेणेसाठी महाराष्ट्र राज्य
खादी व ग्रामोद्योग मंडळ उद्योग भवन तळ मजला
कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी
नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment