Tuesday, June 19, 2018


महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धा
नांदेड दि. 19 :- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी "राजर्षी शाहू महाराज व सामाजिक समता" निबंध व "सामाजिक समता आणि वैज्ञानिक प्रगती" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन गुरुवार 21 जून 2018 रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र घेऊन जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.  
जिल्हास्तरीय सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समिती मार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त गुरुवार 21 जून रोजी सकाळी 11 वा. जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निबंध स्पर्धेचा विषय "राजर्षी शाहू महाराज व सामाजिक समता" असून निबंध 1 हजार 500 शब्दात लिहिणे आवश्यक आहे. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येईल. ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे त्यांनी 21 जून रोजी सकाळी 11 वा. जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे उपस्थित रहावे. तसेच 21 जून रोजी दुपारी 2 वा. "सामाजिक समता आणि वैज्ञानिक प्रगती" या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेत सर्व महाविद्यालयीन मुला-मुलींना भाग घेता येईल. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...