Friday, May 25, 2018

पीक कर्जमाफीचे अर्ज करण्यास 5 जून
तर समझोता योजनेसाठी 30 जूनची मुदतवाढ  
वंचित शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 25 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मंगळवार 5 जून 2018 पर्यंत उपलब्ध करुन दिली आहे. एक लाख 50 हजारापेक्षा जास्त थकीत कर्ज असणाऱ्या शेतक-यांना एकरकमी समझोता योजनेत 1 लाख 50 हजार रुपयापेक्षा अधिकची रक्कम बॅंकेत जमा करण्यासाठी शनिवार 30 जून 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच दि. 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 पर्यत उचल केलेल्या पीक, इमुपालन, शेडनेट, पॉली हाऊसाठी मध्यम मुदत कर्ज 30 जून 2016 रोजी थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 1 मार्च 2018 रोजी पासून केलेल्या अर्जा नवीन माहिती समाविष्टासाठी शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करावीत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.  
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने ज्या शेतकऱ्यांना सन 2008 2009 मध्ये केंद्र व राज्य शासनाव्दारे कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, असे शेतकरी वगळून 1 एप्रिल 2001 ते  31 मार्च 2009 मधील कर्जदार शेतक-यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा दि. 9 21 मे 2018  रोजीच्या शासन निर्णयाद्वारे या योजनेची व्याप्ती वाढवली आहे.
ज्या शेतक-यांनी 22 सप्टेंबर 2017 पूर्वी किंवा 1 मार्च 2018 पासून आता पर्यत ऑनलाईन पध्दतीने कोणताही अर्ज सादर केला नाही त्यांनी ऑनलाईन अर्ज भरावीत. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांना नव्याने कर्जाची आवश्यकता असल्यास त्यांनी संबंधित बॅंकेकडे कर्ज मागणी करावी व ज्यांना कर्ज मिळण्याबाबत अडचणी आहेत त्यांनी संबंधित तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक    120   महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त  पूर्व परीक्षा   केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश     नांदेड , दि.   28 जानेवारी ...