उच्चरक्तदाब, मधुमेह शिबिरात
367 व्यक्तींची तपासणी
नांदेड,दि. 28 :- जागतिक
उच्चरक्तदाब दिन व सप्ताह 17 ते 24 मे
2018 या कालावधीत संपन्न झाला. त्याअनुषंगाने श्री गुरुगोबिंद
सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम व
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच.आर. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 30
वर्ष वायोगटावरील 367 व्यक्तींचे उच्च रक्तदाब
व मधुमेहाची तपासणी करण्यात आली.
त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा, राज्यकर
सहआयुक्त कार्यालय, सहाय्यक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन)
कार्यालय, एम्प्लॉयमेंट ऑफिस, रेल्वे
स्टेशन नांदेड, वजिराबाद पोलीस स्टेशन तसेच मध्यवर्ती बस
स्थानक नांदेड येथील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. या शिबिरास जिल्हा
रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप्रिया गहेरवार, डॉ.
प्रदीप बोरसे, डॉ. साईप्रसाद शिंदे, समुपदेशक
सुवर्णकार सदाशिव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष बेटकर, अधिपरिचारिका वर्षा सोळंके, रावणवेणी राधिका उपस्थित
होते. या शिबिरास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दिपक हजारी यांचे सहकार्य मिळाले.
000000
No comments:
Post a Comment