लोकराज्यच्या
‘महामानवाला अभिवादन’ या
विशेषांकाचे
जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांच्या हस्ते प्रकाशन
नांदेड दि. 11 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या
मासिकाच्या एप्रिल 2018
च्या ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे प्रकाशन नांदेडचे
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते आज झाले.यावेळी मुखेडचे आमदार डॉ. तुषार
राठोड, निवासी
उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा
ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.
व्ही. तोटावार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, मुख्याधिकारी पी. डी. गंगनर,
नगररचनाचे के. पी. पाटील आदि उपस्थित होते.
श्री. डोंगरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल 2018
रोजीच्या 127 व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तत्व,
विचार व आचरणावर प्रकाशित करण्यात आलेल्या लोकराज्य च्या
विशेषांकाचे कौतूक करुन हा अंक ख-या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
कार्यकर्तत्वाला मानवंदना असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा
माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी स्वागत केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल 2018
रोजीच्या 127 व्या जयंतीनिमित्त माहिती
व जनसंपर्क विभागामार्फत प्रकाशित
करण्यात आलेल्या महामानवाला अभिवादन या विशेषांकाची माहिती दिली.
या विशेषांकातील सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची
पत्रकार मधू कांबळे यांनी घेतलेली मुलाखत, राजषी शाहू आणि
डॉ. आंबेडकर (डॉ. जयसिंगराव पवार ) ,परिवर्तनाचे अग्रदूत
(डॉ. शैलेंद्र लेंडे ), जलनीतीचे उद्गाते
(अविनाश आ. चौगुले ), ऊर्जाशक्तीला
चालना (डॉ. जी. एस. कांबळे), उत्कृष्ट संसदपटू आणि
शिस्तप्रिय प्रशासक (डॉ. संभाजी खराट ), बाबासाहेबांची
जयंती कधी आणि कोणी सुरु केली ? महामानवाचा
स्मृतिगंध ( मिलिंद
मानकर ), ग्रंथकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. संदेश वाघ),
बुद्विवादीची प्रेरक शक्ती (प्रा. डॉ. म. सु. पगारे), शिक्षणाची मुहुर्तमेढ (दत्ता गायकवाड ), शांततामय
सहजीवनाचे हमीपत्र (डॉ. अक्रम ह.पठाण ), महामानवाचा
जीवनपट, समतेचा उद्गाता (प्रा. नागसेन भीमरावजी ताकसांडे
), प्रेरणा , ऊर्जा आणि स्फूर्ती
देणारी तीर्थस्थळे (डॉ. बबन जोगदंड ), सुरक्षेचा प्रहरी
(डॉ. विजय खरे ), ज्येष्ठ विचारवंत डॉ.गंगाधर पानतावणे
यांच्यावरील दलित
साहित्याचा आधारवड (यशवंत भंडारे ), आदि लेख वाचनीय आहेत.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सदरचा अंक खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड मार्फत करण्यात येत आहे.
यावेळी विजय होकर्णे,
आरेवार आदि उपस्थित होते.
0000000
No comments:
Post a Comment