Saturday, April 14, 2018

भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर 127 वी जयंती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
जनसागराकडून विनम्र अभिवादन
मिरवणुका, रॅलीतील तरुणाईच्या सहभागाने चैतन्य
नांदेड दि. 14 :- भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती दिनानिमित्त त्यांना अलोट जनसागराने मिरवणुका, प्रभात फेऱ्या तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन केले. डॅा. आंबेडकर यांच्या अभिवादनासाठीचा कार्यक्रम, उपक्रमांनी शहर-जिल्ह्यात दिवसभर लगबग राहिली. प्रभातफेऱ्या, प्रबोधनपर कार्यक्रम, व्याख्याने-विविध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.  शहरातील डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात नागरिक एकत्र आले. पुतळ्यास अभिवादन करतानाच, शहर आणि परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
त्यासाठी सकाळी विविध संघटना, संस्था यांच्यावतीने डॅा. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, विविध यंत्रणांनाचे प्रमुख आदींनीही अभिवादन केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांनी उपस्थितांना जयंती दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी महापौर शिलाताई भवरे, आमदार डी. पी. सावंत, उपमहापौर विजय गिरडे, मनपा स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुला, मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भगवान वीर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार आदींनी अभिवादन केले.
दिवसभरही नांदेड शहरात मिरवणुका, रॅली यांचा जल्लोष राहिला. मिरवणुका, पदफेऱ्या यांच्यात सहभागींसाठी शहरातील विविध मार्गा-मार्गावर ठिक-ठिकाणी संस्था, संघटना, उत्सव मंडळांनी उत्स्फुर्तपणे पिण्याचे पाणी, फराळ, फळे वाटप केले. गर्दीच्या ठिकाणी आणि मिरवणुकीतील विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...