Friday, April 6, 2018


कर्जमाफी योजनेला 14 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
वंचित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था
नांदेड , ‍दि. 6 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत आता 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी  अशा शेतकऱ्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी   केले.  
तसेच मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही एकवेळ समझोता (वन टाईम सेंटलमेट) योजनेंतर्गतही पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्याचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.
राज्य सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने 31 मार्च 2018 रोजी शासन निर्णय निर्गमित केला असून या आदेशाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपले सरकार या सेवा केंद्रावर किंवा https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. आपले सरकार पोर्टलवर माहिती भरुन ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नि:शुल्क आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

निवडणुकीच्या लगबगीत माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे नांदेड लोकसभापोटनिवडणुकीत निवडणूक ...