Wednesday, March 7, 2018


देवेंद्र भुजबळ यांना
राष्ट्रीय जनसंपर्क पुरस्कार

औरंगाबाद,दि. 7 -- भारतातील जनसंपर्क क्षेत्रातील सर्वोच्च संस्था समजल्या जाणाऱ्या पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय, विधायक आणि दिशादर्शक काम करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
शासकीय जनसंपर्क गटातील यंदाच्या  " नॅशनल चाणक्य अवार्ड - कम्युनिकेटर ऑफ ईयर पब्लिक कम्युनिकेशन गर्व्हंनमेंट पीआर" या पुरस्कारासाठी श्री. देवेंद्र भुजबळ यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक 9 10 मार्च 2018 रोजी पुणे येथे होणाऱ्या "ग्लोबल कम्युनिकेशन कॉनक्लेव्ह" मध्ये देण्यात येईल. या दोन दिवसीय कौन्सिलने विविध चर्चासत्र, कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
-*-*-*-

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...