Monday, March 12, 2018


जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत
लाभार्थ्यांची नावे अंतिम करण्यासाठी प्रसिद्ध
पात्र अर्जदारांनी कर्ज मंजुरीचे पत्र ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन   

नांदेड दि. 12 :- जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांची नावे अंत करण्यासाठी महाऑनलाईनवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र अर्जदारांनी वित्तीय संस्थेकडून विनाअट कर्ज मंजुरीबाबतचे पत्र शुक्रवार 23 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
राज्यातील जलयुक्त शिवार अभियान तसेच जल मृद संधारणाच्या कामांना गती मिळावी स्किल  इंडियाच्या धर्तीवर ग्रामीण भागातुन कुशल उद्योजक तयार करणे या दुहेरी उद्देशाने राज्य शासनाच्या मृद जलसंधारण विभागाने, "जलसमृद्धी यंत्र सामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना" राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून अर्थमुव्हर्स खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज शासन भरणार आहे. या योजनेंतर्गत प्रथम टप्प्यात दि. 31 जानेवारी, 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्जाची जिल्हास्तरीय समितीकडून छाननी करून योजनेंतर्गत लाभार्थ्यांची नावे अंतिम करण्यासाठी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.  ही यादी  जिल्हाधिकारी कार्यालय राष्ट्रीयकृत बँकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीतील पात्र अर्जदारांनी राष्ट्रीयकृत बँकेकडून सदर योजनेतंर्गत शासन निर्णयाप्रमाणे विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या Log in ID द्वारे शुक्रवार 23 मार्च, 2018 पर्यंत ऑनलाईन सादर करावयाचे आहे.
कर्ज मंजुरी पत्रामध्ये शासनाचे दायित्व, अनुज्ञेय असलेल्या व्याजाच्या परताव्याच्या रकमेकरिता कर्जाच्या रकमेची कमाल मर्यादा रु.17.60 लक्ष राहील त्यानुसार पाच वर्षामध्ये शासनामार्फत कमाल व्याज परतावा रक्कम रु.5.90 लक्ष पर्यंत राहील. अशी अट वित्तीय संस्थेस (बँक) मान्य असल्याचे स्पष्टपणे नमूद असावे. कर्ज मंजुरी बाबतचे संपूर्ण अधिकार हे संबंधित बँक / वित्तीय संस्थेचेच राहणार असून या संदर्भातील बँकेच्या असणाऱ्या संपूर्ण अटी शर्ती यांची पूर्तता करण्याची जबाबदारी लाभार्थी यांची राहील.
वित्तीय संस्था / बँकेकडून कर्ज मंजुरीचे पत्र सादर करण्यात आलेल्या अर्जदारांची संख्या जास्त असल्यास जिल्हा स्तरीय समितीने जाहीर सोडत काढून दिलेल्या लक्षांकाप्रमाणे लाभार्थी निवडण्यात येतील. यामुळे पात्र लाभार्थी यांनी बँकेचे विनाअट कर्ज मंजुरीबाबतचे पत्र 23 मार्च, 2018 पर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन करण्यात आहे. दि. 23 मार्च 2018 नंतर दाखला सादर करणाऱ्या अर्जदारांचा विचार लाभार्थी निवडताना करण्यात येणार नाही. याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...