जनतेने
शांतता व संयम ठेवावा
पालकमंत्री
खोतकर यांचे आवाहन
नांदेड, दि. 3 :- नांदेड जिल्ह्यातील जनतेने शांतता
व संयम ठेवून कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेवू नये, सामंजस्याचे
वातावरण निर्माण करुन सलोखा निर्माण करावा, असे आवाहन नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे.
भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभुमीवर
नांदेड शहरात घडलेल्या हिंसक प्रकारानंतर आजही तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यासर्व
घटनांचा आपण आढावा घेत असून, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी
संपर्कात आहोत. जनतेने कायदा हातात न घेता शांतता व संयम ठेवून सलोखा निर्माण
करावा, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याचीही काळजी घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला
सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. खोतकर यांनी
केले आहे.
00000
No comments:
Post a Comment