Monday, January 1, 2018

महाराष्ट्र विधानमंडळ
अंदाज समितीचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 1 :- महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीने 3 व 4 जानेवारी 2018 रोजी नांदेड जिल्ह्यात दौरा निश्चित केला असून दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
मंगळवार 2 जानेवारी 2018 रोजी रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम करतील. बुधवार 3 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे संबंधीत विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील नगरविकास विभागाच्या अखत्यारितील सर्व महानगरपालिका व नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह (परिवहन) विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महसूल व वन (वने व गौण खनिज) विभाग,  जलसंपदा विभाग व जलयुक्त शिवार योजनेच्या अनुषंगाने ग्रामविकास व जलसंधारण, वने आणि कृषि विभाग आदी विभागांच्या प्रकल्प, कामांस भेट व पाहणी. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायं 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील नगरविकास विभागाच्या अखत्यारितील सर्व महानगरपालिका व नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह (परिवहन) विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महसूल व वन (वने व गौण खनिज) विभाग, जलसंपदा विभाग व जलयुक्त शिवार योजनेच्या अनुषंगाने ग्रामविकास व जलसंधारण, वने आणि कृषि विभाग इत्यादी विभागांच्या उर्वरीत प्रकल्प, कामांस भेट व पाहणी करतील. रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम.
गुरुवार 4 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील नगरविकास विभागाच्या अखत्यारितील सर्व महानगरपालिका व नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह (परिवहन) विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महसूल व वन (वने व गौण खनिज) विभाग, जलसंपदा विभाग व जलयुक्त शिवार योजनेच्या अनुषंगाने ग्रामविकास व जलसंधारण, वने आणि कृषि विभाग इत्यादी विभागांच्या उर्वरीत प्रकल्प, कामांस भेट व पाहणी करतील. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायं 5 यावेळेत समितीने नांदेड जिल्ह्यात दिलेल्या भेटी व पाहणीच्या वेळी आढळून आलेल्या बाबींच्या संदर्भात तसेच लेखी स्वरुपात प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबंधीत अधिकारी यांच्या समवेत बैठक.
या अंदाज समितीतील सदस्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत. वि. स. स. तथा समिती प्रमुख अनिल कदम, वि. स. स. सर्वश्री ॲड. राज पुरोहित, धनंजय ऊर्फ सुधीर गाडगीळ, उन्मेष पाटील, कृष्णा खोपडे, श्रीमती देवयानी फरांदे, विजय रहांगडाले, राजेश काशिवार, बाळासाहेब मुरकुटे, आकाश फुंडकर, कृष्णा गजबे, सुनिल प्रभु, प्रकाश आबिटकर, डॉ. संजय रायमूलकर, प्रतापराव पाटील-चिखलीकर, विजय वडेट्टीवार, कुणाल पाटील, वसंतराव चव्हाण, श्यामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, प्रदिप जाधव (नाईक), धैर्यशील पाटील, अबु आझमी, सुजितसिंह ठाकूर, डॉ. निलम गोऱ्हे, जयंतराव जाधव, ॲड राहुल नार्वेकर, संजय दत्त, अनंत गाडगीळ तसेच विधीमंडळाचे अधिकारी  सहसचिव अशोक मोहिते, उपसचिव शिवदर्शन साठे, अव्वर सचिव विजय कोमटवार, कक्ष अधिकारी सु. अ. परब यांचाही समावेश राहणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...