नांदेड,
दि. 19 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी
यांच्या दालनात सशस्त्र सेनादल ध्वजदिन निधी संकलन 2017-2018 विशेष मोहीम राबविण्याकरिता
मा. विभागीय आयक्त , औरंगाबाद यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील सर्व
कार्यालय प्रमुखांची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित
करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी प्रभारी
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आवाहन केले की, जिल्ह्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी
, कर्मचाऱ्यांकडून निधी त्यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी रुपये आठशे, अधिकारी वर्ग -
एक रुपये पाचशे, अधिकारी वर्ग - दोन रुपये तीनशे , कर्मचारी वर्ग - तीन रुपये दोनशे
तसेच कर्मचारी वर्ग- चार यांनी स्वेच्छेनुसार ध्वजदिन निधी संकलीत करुन जिल्ह्यास दिलेला
इष्टांक रुपये 50 लक्षापर्यंत पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला . सदरचा निधी दिनांक
31 डिसेंबर, 2017 पर्यंत उत्स्फुर्तपणे जमा करण्याचा निर्धार सर्व कार्यालय
प्रमुखांनी केला याबाबतचे सर्वांना आवाहन पत्रकाचे वाटप करण्यात आले. संकलित झालेला
निधी जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड यांच्या नावे, रोखीने
, धनादेश, धनाकर्ष स्वरुपात बनवून जिल्हा सैनिक कार्यालय, नवीन तहसील कार्यालय आवार , चिखलवाडी
कॉर्नर , नांदेड यांच्याकडे जमा करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी
कळविले आहे. या बैठकीचे प्रास्ताविक श्री. कमलाकर शेटे कल्याण संघटक यांनी केले .
****
No comments:
Post a Comment