खेळाडुनी
खेळात सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे
- अजित कुंभार
नांदेड,
दि. 30:- खेळाडुनी खेळात आपल्यातील सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे, असे
आवाहन किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प किनवट अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचा वार्षिक प्रकल्प
स्तरीय क्रिडा स्पर्धेचा शुभारंभ सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या हस्ते
शासकीय आश्रमशाळा किनवट येथे संपन्न झाला. त्यावेळी खेळाडुंना मार्गदर्शन करताना
ते बोलत होते.
कार्यक्रमाची
सुरुवात सहस्त्रकुंड, बांधेडी, उमरी व सारखणी या केंद्रातंर्गत येणाऱ्या शासकीय व
अनुदानित आश्रमशाळेतील 577 खेळाडुंच्या
शानदार संचलनाने झाली.
या
उद्घाटन सोहळ्यास नियोजन अधिकारी अर्जून झाडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन),
सुनिल बारसे, कार्यालयीन अधीक्षक श्री. बोंतावार, स.प्र.अ. शिक्षण रजनवलवार, श्री.
शेगोकार, क.शि.वि.अ श्री. जगदाळे, श्री. चटलेवाड , श्रीमती गोरे , पंच कमिटी सदस्य
श्री. पठाण , किनवट शाळेचे मुख्याध्यापक श्री. कराड आदिंची उपस्थिती होती. प्रस्ताविक श्री. कराड यांनी तर आभार व्ही. आर.
खांडरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment