Wednesday, October 4, 2017

मराठवाड्यात अतिवृष्‍टीचा इशारा;
नागरिकांनी सतर्कता बाळगावी
नांदेड दि. 4 :- मराठवाडा, विदर्भ, मध्‍य-महाराष्ट्रात भारतीय हवामान विभागाने 5 ते 14 ऑक्टोंबर दरम्यान अतिवृष्‍टीचा इशारा दिला आहे. नांदेड जिल्‍हयातील नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता अतिवृष्टीत पुरापासून सतर्कता बाळगावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.   
सध्या शंकरराव चव्‍हाण विष्‍णुपुरी प्रकल्‍पात 95 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्‍याचा येवा वाढत राहिल्‍यास केंव्‍हाही अतिरिक्‍त जलसाठा विसर्ग करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्‍हयातील इतर नदीकाठच्‍या ठिकाणी या अतिवृष्‍टीचा धोका होऊ शकतो. याकाळात शेतकऱ्यांनी धान्‍ये सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. विजेचा कडकडाट होत असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावे. कोणत्याही परस्थितीत उंच झाडाचा आसरा घेऊ नये. विद्यार्थी व नागरिकांनी नदी, ओढ्याकाठच्‍या धोकादायक स्वरुपात पाणी वाहणाऱ्या पुलावरुन किंवा पाण्यात जाण्याचे टाळावे. आणीबाणीच्या प्रसंगी सतर्क राहुण याबाबत वेळोवेळी कुठल्‍याही प्रकारची गरज पडल्‍यास जिल्‍हा प्रशासनाच्‍या वरीष्‍ठ कार्यालयांना त्वरीत कळवावे. जिल्‍हा पुर नियंत्रण कक्ष, सिंचन भवन, नांदेड हे 24 तास कार्यरत असून त्‍यांचा दुरध्‍वनी क्रमांक (02462) 263870 असा आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...