Sunday, October 8, 2017

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे 
नांदेड विमानतळावर स्वागत 
नांदेड दि. 8 :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव यांचे आज नांदेडच्या श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर स्वागत करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव यांचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. पंडीत विद्यासागर यांनीही पुष्पगुच्छ देवून राज्यपाल महोदयांचे स्वागत केले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, यांनी स्वागत केले. राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव हे परळी जि. बीड दौऱ्यावर आले होते. त्यासाठी त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले होते.
0000000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...