Wednesday, October 25, 2017

नेव्ही माजी सैनिकांची मंगळवारी बैठक
नांदेड, दि. 25 :- नेव्हीतील सेवानिवृत्त माजी सैनिक व विधवा यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी वेर्स्टन कंमाड  नेव्हीचे सेवारत कॅप्टन पी. प्रशांत हे मंगळवार 31 ऑक्टोंबर रोजी  सकाळी 10 वा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास  भेट  देत आहेत. जिल्हयातील सर्व नेव्ही मधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक व विधवा यांनी  बैठकीस उपस्थीत राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील दिव्यांगांशी संवाद दिव्यांग बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर, दि.02 (विमाका) : म...