Thursday, October 5, 2017

जवाहर नवोदय विद्यालयात
प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड दि. 5 :-  जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा 2018 साठी प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात तालुकानिहाय मान्यता प्राप्त अधिकृत सातशे सेतु केंद्राच्या माध्यमातून प्रवेश अर्जासाठी शनिवार 25 नोव्हेंबर 2017 ही अंतिम मुदत आहे, असे आवाहन बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी केले आहे.
संबंधीत तालुक्यातील जवळचे अधिकृत सेतु केंद्र शोधण्यासाठी लिंक hattp://gis.csc.gov.in/locator/csc.aspx उपयोग करावा. प्रवेश अर्जाचे माहितीपत्रक प्रमाणपत्र जवाहर नवोदय विद्यालयाच्या www.jnvnanded.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज ऑनलाईन भरताना संबंधीत तालुक्यातील मान्यताप्राप्त व अधिकृत सेतु केंद्रावर सोबत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नंबर, शाळेचे पालक व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी, शाळेचा शिक्का असलेले प्रमाणपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर पावती घ्यावी. यासाठी संबंधीत शाळा, मुख्याध्यापक यांनी आपल्या गटातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाची मदत घ्यावी. संबंधीत गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत आपल्या गटातील शाळांना, पालकांना आवश्यक माहिती त्वरीत देवून जास्तीत जास्त ऑनलाईन प्रवेश अर्ज करावे, असे आवाहन प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...