Thursday, October 26, 2017

दहावीच्या मार्च 2018 परीक्षेसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक जाहीर
नांदेड, दि. 26 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या मार्च 2018 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या तारखा मंडळाने जाहीर केल्या आहेत.
परीक्षेस नियमित प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले पुर्वीचे खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यात यावेत.
माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची मुदत नियमित शुल्कासह 16 ऑक्टोंबर ते सोमवार 6 नोव्हेंबर 2017  पर्यंत, शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची मुदत मंगळवार 7 ते 14 नोव्हेंबर 2017 पर्यंत. विभागीय मंडळाकडे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची मुदत सोमवार 27 नोव्हेंबर 2017 आहे.  तर विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरावयाची मुदत मंगळवार 7 ते 14 नोव्हेंबर 2017 पर्यंत, शाळांनी बँकेत चलन सादर करावयाची मुदत बुधवार 15 नोव्हेंबर ते मंगळवार 21 नोव्हेंबर 2017 पर्यंत. विभागीय मंडळाकडे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाच्या तारीख सोमवार 27 नोव्हेंबर 2017 आहे.
बुधवार 15 नोव्हेंबर ते शनिवार 25 नोव्हेंबर 2017 या कालावधीत शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्या एक्सलमध्ये मुद्रीत कराव्यात. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळेशी संपर्क साधावा. ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीबाबत मुख्याध्यापक यांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.  ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाण नमूद करण्याची कार्यवाही शाळांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करावी. प्रचलित शुल्क बॅक ऑफ इंडियात जमा करुन बँक ऑफ इंडियाची चलनाची प्रत, विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर करण्यात याव्यात. अर्जामध्ये आधारकार्ड क्रमांक नमुद करण्याबाबत अनिवार्य केलेले असले तरी एखादा विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नोंदणी केलेली असेल तर नोंदणी क्रमांक देखील ग्राह्य धरण्यात येईल. आधार नोंदणी केली नसेल तर निकालापर्यंत आधार कार्ड काढण्यात येईल असे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना लेखी हमीपत्र देणे आवश्यक आहे. आधार कार्ड क्रमांक नाही म्हणून अर्ज भरले नाही असे होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...