Tuesday, October 31, 2017

माल 12 टक्क्यापर्यंत ओलावा असलेला, काडी कचरा विरहीत, स्वच्छ,
एफएक्यु दर्जा असल्याची खात्री करुन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा
 ---- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन


नांदेड दि. 31 :- नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर आणण्यासाठी भ्रमणध्वनीवर संदेश मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी आपला माल 12 टक्क्यापर्यंत ओलावा असलेला , काडी कचरा विरहीत , स्वच्छ , एफएक्यु दर्जाचा असल्याची खात्री करुन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा , असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे मूग-उडिद व सोयाबीन केंद्रे सुरु करण्यासंदर्भात आयोजित बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे पुढे म्हणाले की, केंद्र शासनाचे आधाभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडमार्फत हमी भावाने मुग-उडिद खरेदी करिता देगलूर, धर्माबाद, बिलोली येथे केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत.
तसेच सोयाबीनकरिता नांदेड , लोहा , देगलूर, धर्माबाद, बिलोली , हदगाव , मुखेड, भोकर व उमरी येथे केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. खरेदी केंद्रावर माल विक्री करण्याकरिता ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. तसेच शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणीकरिता सोबत सातबाराचा उतारा 2017-2018 चा पिकपेऱ्याची नोंद असलेला आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत (झेरॉक्स) प्रत आणावी.
            या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा मोर्केटिंग अधिकारी श्री. दांड, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, नांदेड तालुका उपनिबंधक पी. ए. साठे, कापूस पणन महासंघाचे उपव्यवस्थ्ज्ञापक एस. जी. हनवते तसेच सर्व सहाय्यक निबंधक, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव आदि. विविध विभागाचे विभाग प्रमुखांची या बैठकीस उपस्थिती होती.     

****  
जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सत्कार  

नांदेड दि. 31 :- जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी दिनांक 31 ऑक्टोबर, 2017 रोजी नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त होत असल्याने त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून शाल येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी सभागृहात करण्यात आला. 
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी , अप्पर कोषागार अधिकारी निलकंट पांचगे , जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांच्यासह अधिकारी , कर्मचारी  आदिंची यावेळी उपस्थिती होते.  

****     
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जिल्हाधिकारी डोंगरे
यांच्या हस्ते प्रारंभ विविध घटकांचा सहभाग  
नांदेड दि. 31 :- विविधतेतील एकतेचा मंत्र घेवून लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज शहरात एकता दौड संपन्न झाली. या दौडमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उत्साहात सहभागी झाले. महात्मा गांधी पुतळा परिसर वजिराबाद ते जुना मोंढा टॉवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत एकता दौड काढण्यात आली. या दौडमध्ये सुरेख वेशभूषेतील विद्यार्थी, अग्निशमन व पोलीस दलाच्या पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.   
एकता दौडच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर एकता दौडचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. 
दौडमध्ये पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. पी. घुले, जिल्हा नियोजन अधिकारी सरेश थोरात, जिल्हा क्रिडा अधिकारी गंगालाल यादव,  प्रवीस साले, दिलीप ठाकूर, प्रा. नंदू कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी आदि सहभागी होते.
तसेच पोलीस दलाच्या पथकाने वाद्य वृदांसह संचलन करत या दौडमध्ये सहभाग घेतला. महात्मा गांधी पुतळा, शिवाजी पुतळा, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते वजिराबाद मार्केट रस्ता, महावीर चौक, जुना मोंढा टॉवर या ठिकाणाहून एकता दौड मार्गक्रमण झाली. या दौडमध्ये सहभागी घटकांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा दिल्या. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीपर फलक घेवून दौडमध्ये सहभागी झाले.  
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात दौडमध्ये सहभागी पथके, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी  एकतेच्या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची प्रतिज्ञा व दक्षता जनजागृती दिनानिमित्त शपथ दिली. दौडमध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

****  
जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांना भावपूर्ण निरोप  

नांदेड दि. 31 :- जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथील जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी हे नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने छोटोखानी सोहळ्यात श्री. दिलीप गवळी यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.  
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त कार्यभार स्विकारलेले परभणी येथील जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी म्हणाले की, सर्वांचे सहकार्यातून नांदेड येथे चांगले काम करता आहे. याकाळात नांदेड जिल्ह्यातील घडामोडींशी समरस होऊन काम करता आहे. येथील विविध घटकांकडून खूप काही शिकता आले, ही खूप मोठी शिदोरी आहे,  ही खूप मोठी शिदोरी आहे.  ही आठवण कायम स्मरणात राहिल , असेही ते म्हणाले.    
यावेळी छायाचित्रकार विजय होकर्णे, दुरमूद्रणचालक विवेक डावरे, लिपीक सौ. अलका पाटील, के. आर. आरेवार, वाहन चालक प्रवीण बिदरकर, महमंद युसुफ मौलाना, अंधार कोठडी सहाय्यक अंगली बालनरस्या, आदिंनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनीही मनोगत व्यक्त करुन त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.   
दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, सामाजिक कार्यकर्ते वसंत मैय्या , उमाकांत जोशी, अब्दुल सत्तार, तौफिक मिर्झा, महंमद युसुफ , जयसिंग जाधव आदिंचीही यावेळी उपस्थिती होती.  सर्वांनी श्री. गवळी यांना शुभेच्छा दिल्या.   

****
जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सत्कार  

नांदेड दि. 31 :- जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी दिनांक 31 ऑक्टोबर, 2017 रोजी नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त होत असल्याने त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून शाल येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी सभागृहात करण्यात आला. 
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी , अप्पर कोषागार अधिकारी निलकंट पांचगे , जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांच्यासह अधिकारी , कर्मचारी  आदिंची यावेळी उपस्थिती होते.  

                                                     00000
वाहनांचे ब्रेक, वाहन तापसणी चाचणी
आजपासून वाघी येथे घेण्यात येणार
नांदेड दि. 31 :- नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नांदेड तालुक्यातील मौ. वाघी येथील शासकीय जागेवर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारला आहे. नांदेड तसेच परभणी जिल्हयातील सर्व वाहतूकदारांची बुधवार 1 नोव्हेंबर 2017 पासून मौजे वाघी येथील शासकीय जमिनीवर बांधण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकवर योग्यता प्रमाणपत्रासाठी  परिवहन संवर्गातील वाहनांचब्रेक वाहन तपासणीची चाचणी घेण्यात येणार आहे.
मा. उच्च न्यायालयाने 18 फेब्रुवारी 2016 त्यानंतर वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशान्वये परिवहन वाहनांचे ब्रेक तपासणी योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेणे आवश्यक आहे. ही तपासणी 1 नोव्हेंबर 2017 पासून त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही खाजगी जागेत अथवा सार्वजनिक रस्त्यावर घेण्यात प्रतिबंधित करण्यात आले आहे. नांदेड, परभणी जिल्हयातील सर्व वाहतूकदारांना वाहने तपासणीसाठी मौजे वाघी येथे नेण्यात यावीत. ही कार्यपध्दती पुढील आदेश होईपर्यंत चालू राहणार आहे.  परिवहन संवर्गातील वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र तनीकरणासाठी परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in/appointment/vahan या संकेतस्थळावर अपॉईंटमेंट घेऊनच कागदपत्रया कार्यालयात सादर करण्यात यावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
जिल्ह्यात खत विक्री होणार आजपासून ऑनलाईन
नांदेड दि. 31 :-  खत खरेदी ऑनलाईन पध्दतीने करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी बुधवार 1 नोव्हेंबर 2017 पासून होणार आहे. जिल्हयातील 625 खत विक्रेत्यांना पॉईट ऑफ सेल (पीओएस) मशीन देण्यात आल्या असून खत खरेदी करताना शेतकऱ्याच्या बोटाचा ठसा घेऊन आधारकार्ड नंबर नोंदविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपले आधारकार्ड दर्शवून रासायनिक खताची खरेदी करावी तसेच हा प्रकल्प जिल्हयात यशस्वीरित्या राबविला जाईल याबाबत सर्वांनी सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
त्यानुसार शेतकऱ्याने बिलाची रक्कम अदा करुन खत खरेदी करायचे आहे. त्यानंतर ही नोंद पीओएस मशीनच्या माध्यमातून केंद्रीय सर्व्हरवर नोंद होणार आहे. त्यानुसारच खतांवर देण्यात येणारे अनुदान शासनाकडून संबंधित खत कंपन्यांना देण्यात येईल. त्यामुळे अनुदानाचा दुरुपयोग टाळता येणार असून राज्यात 1 नोव्हेंबर 2017 पासून या पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे.  
रासायनिक खतांवर केंद्र शासनाकडून मोठया प्रमाणात अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा दुरुपयोग टाळावा तसेच शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ व्हावा, यासाठी या पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. जिल्हयातील किरकोळ खत विक्रेत्यांना तसेच कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पध्दतीने खताची विक्री करताना किंवा शेतकऱ्याने खत खरेदी करताना शेतकऱ्याला आधारकार्ड असणे आवश्यक आहे. कारण पीओएस मशिनवर संबंधीत शेतकऱ्यांच्या बोटाचा ठसा घेऊन त्याचा आधारकार्ड नंबर नोंद करायचा आहे. त्यानुसार ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर त्याला खताची विक्री होणार आहे.नंतर त्या शेतकऱ्याने खताच्या खरेदीची रक्कम अदा करायची आहे.
रासायनिक खत विक्री करीता थेट लाभ हस्तांतरण (DBT) 1 नोव्हेंबर 2017 पासून राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली  रासायनिक खत उत्पादक प्रतिनिधी, खत विक्रेते यांच्या वेळोवेळी  बैठका घेण्यात आल्या आहेत. 
            नांदेड जिल्हयात 30 ऑक्टोंबर 2017 अखेर एकूण 546 ePos मशिनचे वाटप विक्रेत्यांना करण्यात आले असून त्यापैकी 499 ePos मशिन कार्यरत झाले असून त्यापैकी 373 ePos मशिनवर रासायनिक खताचा साठा नोंदविण्यात आला आहे. उर्वरीत ePos मशिन मशिनवर 31 ऑक्टोंबर 2017 रोजी सायंकाळ पर्यंत रासायनिक खताचा साठा नोंदविण्यात येईल. या प्रकल्पाचे नोडल अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे तसेच तालुका पंचायत समितीचे सर्व कृषि अधिकारी यांच्या मार्फत मागील 3 दिवासापासून खत विक्रेत्याकडील साठा ePos मशिनमध्ये नोंदविण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात येत आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...