Friday, September 29, 2017

शेतकरी कर्जमाफी ऑनलाईन
अर्जाचे चावडी वाचन सुरु
नांदेड दि. 29 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 329 गावामध्ये 2 लाख 66 हजार 133 कर्जमाफीसाठी ऑनलाईन दाखल अर्जाचे चावडी वाचन नांदेड जिल्ह्यातील निवडणूक आचार संहिता लागू असलेल्या ग्रामपंचायती वगळता प्रत्येक गांवामध्ये करण्यात येत आहे. थेट कर्जमाफीच्या लाभाशी निगडित याद्यांचे  वाचन होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी मोठया संख्यने हजेरी लावल्याचे दिसून येते.
कर्जमाफीसाठी जिल्हयातील 2 लाख 66 हजार 133 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. प्राप्त अर्जाचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडीट) करण्यासाठी गाव निहाय चावडी वाचन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या शेतकऱ्यांनी कुटुंबातील किती सदस्यांच्या नावावर कर्ज घेतले एकापेक्षा अधिक बँकामधून कर्ज घेतले, अर्ज भरलेला शेतकरी इन्कम टॅक्स भरणा करतो का ? कर्जमाफी अर्ज भरणारी व्यक्ती  शासकीय सेवेत आहे का ? एखाद्या व्यक्तीने भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जाबाबत गावातील कोणाला आक्षेप किंवा शंका आहे का ? याबाबतची माहिती चावडी वाचनातून मिळविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
चावडी वाचन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय तिथे शेतकऱ्याचा नावासमोर शेरा लिहिण्याच्या सूचना तालुका समितीने चावडी वाचन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या चावडी वाचन कार्यक्रमास शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे यावेळी  कर्मचाऱ्यांनी निरसन केले. अन्य ग्रामपंचायतीमध्ये पुढील दोन दिवसात चावडीवाचन पूर्ण केले जाईल. कोणाचे आक्षेप असल्यास पुराव्यासह सबंधित तालुक्याचे सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे चावडी वाचनाच्या दिनांकापासून तीन दिवसात देण्यात यावेत, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था  प्रवीण फडणीस यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...