Thursday, September 28, 2017

माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न   
नांदेड दि. 28 :- आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमीत्त "माहिती व तंत्रज्ञानाचा-माहिती अधिकार कायदा अमंलबजावणीत होणारा प्रभाव" या विषयावर आज व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे व उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) श्रीमती अनुराधा ढालकरी यांच्या मार्गदशनाखाली जिल्हाधिकारी यांचे निधी कक्षात हा कार्यक्रम संपन्न झाला.
28 सप्‍टेंबर हा दिवस "आंतरराष्‍ट्रीय माहिती अधिकार दिन" म्‍हणून साजरा करण्यात येतो.  प्रशासनाच्‍या कारभारात पारदर्शकता आणणे आणि प्रशासकास जनतेप्रती उत्‍तरदायी बनवणे यासाठी माहिती अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात 12 ऑक्टोंबर 2005 पासून अस्तित्‍वात आला आहे.
यावेळी सहाय्यक जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर यांनी माहिती अधिकार कायदाची प्रभावी अमंलबजावणी व आरटीआय ऑनलाईन प्रणालीचा वापर याविषयी माहिती दिली. शासनाकडून आरटीआय ऑनलाईन प्रणाली जिल्‍हाधिकारी कार्यालय, महानगरपालीका, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्‍हा परिषद नांदेड या कार्यालयात कार्यान्‍वीत करण्‍यात आली आहे. आरटीआय ऑनलाईन ही सुविधा https://rtionline.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. त्‍यानुसार नागरिक ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज दाखल करु शकतात, अशी माहिती देण्यात आली.
यावेळी प्रथम अपिलीय अधिकारी व जन माहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी व आरटीआय ऑनलाईन संकेतस्‍थळाचे कामकाज हाताळणारे अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते. शेवटी आभार ना. त (धर्मादाय) डी. एन. पोटे यांनी मानले.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...