वृत्त क्र. 864
सेंटरल सेक्टर शिष्यवृत्तीसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 16 :- केंद्र शासन पुरस्कृत सेंटरल सेक्टर शिष्यवृत्तीचे नवीन
अर्ज मंजुरीसाठी सोमवार 30 ऑक्टोंबर 2017 व नुतनीकरणासाठी
ऑनलाईन पद्धतीने शनिवार 30 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन नांदेड
विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक यांनी केले आहे.
तसेच नुतनीकरण अर्ज ऑफलाईन पद्धतीने विहित
नमुन्यात सीडीसह हार्डकॉपी सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड कार्यालयास सादर करावी.
ऑफलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे ऑनलाईन अर्ज सोमवार 30 ऑक्टोंबर 2017
पर्यंत तर नुतनीकरणाचे अर्ज शनिवार 30 सप्टेंबर 2017 पर्यंत संबंधीत
विद्यार्थ्यांनी भरावीत.
नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली
या चार जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय वरिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान अनुदानीत, विना
अनुदानीत, कायम विनाअनुदानीत, महाविद्यालय तसेच व्यवसायिक महाविद्यालयात सन
2017-18 या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने
फेब्रुवारी / मार्च 2017 मध्ये घेतलेल्या इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षेत
गुणवत्ता यादीत टॉपच्या 20 विद्यार्थ्यांना तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी
भारत सरकारची सेंटरल सेक्टर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने नवीन मंजुरी व नुतनीकरणासाठी
नुतनीकरण-1 व नुतनीकरण-2 या पद्धतीने सादर
करावीत. तसेच नुतनीकरण-3 व नुतनीकरण-4 अर्ज ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात सीडीसह
हार्ड कॉपी सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड कार्यालयास सादर करावीत.
00000
No comments:
Post a Comment