Saturday, September 9, 2017

राष्ट्रीय लोकन्यायालयात विविध प्रकरणात  
5 कोटी 10 लाख 79 हजार रुपयांची तडजोड ;
773 प्रकरणे सामोपचाराने निकाली
नांदेड दि. 10 :-  राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्ह्यात विविध प्रकरणात 5 कोटी 10 लाख 79 हजार 309 रुपये इतक्या रकमेबाबत तडजोड झाली असुन 773 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली आहेत. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट., मोटार वाहन अपघात, संपादन, आदी तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय,विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणाच्या दाखल र्व प्रकरणांचा समावेश होता.
            राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश  एस. पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, पॅनलवरील न्यायाधीश, वक, न्यायालयीन व्यवस्थापक, पॅनल सदस्य, विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केल. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे त्यात्या न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, अॅड. मिलिंद एकताटे, उपाध्यक्ष अॅड.  जगजीन भेदे, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, संपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी, तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. त्याबद्दल जिल्हा न्यायाधीश एस.पी. कुलकर्णी यांनी लोकन्यायालय यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. टी. वसावे यांनी यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...