किनवट येथे रोजगार मेळावा
नांदेड दि. 25 :- जिल्हा कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व ग्राम परिवर्तक (आरडीएफ)
यांच्यावतीने 28 व 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गोकुंदा किनवट येथे रोजगार
मेळावा-2 चे आयोजन करण्यात आले आहे. बेरोजगार
पुरुष उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास
केंद्राचे सहायक संचालक यांनी केले आहे.
या मेळाव्यात एसआयएस
कंपनीत सेक्युरिटी गार्ड, सेक्युरिटी सुपरवायझर प्रत्येकी 100 पदासाठी भरती होणार
आहे. इयत्ता दहावी उत्तीर्ण, वयोमर्यादा 20 ते 35 वर्षे, अंदाजीत वेतन 8 ते 22
हजार पर्यंत राहील. उंची 168 सेमी, वजन 50 कि.ग्रॅ. आवश्यक आहे. आधारकार्ड,
सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, दहावी व बारावी सनद, असल्यास जातीचा
दाखला या कागदपत्राच्या झेरॉक्स दोन प्रती आणाव्यात. प्रमोद महाजन कौशल्य विकास
योजना व अण्णासाहेब पाटील बीज भांडवल योजनेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक
माहितीसाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावर, दुरध्वनी 02469-221801 येथे
संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
000000
No comments:
Post a Comment