Thursday, August 3, 2017

रोजगार मेळाव्याचे
9 ऑगस्ट रोजी आयोजन  
नांदेड दि. 3 :-  जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने रोजगार मेळावा- 1 महात्मा फुले मंगल कार्यालय, फुले मार्केट आयटीआय जवळ नांदेड येथे बुधवार 9 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास जिल्ह्यातील रहिवासी व गरीब होतकरु तरुणांनी उपस्थित रहावे , असे आवाहन कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक उल्हास सकवान यांनी केले आहे.
बेरोजगार तरुणांना नवभारत फर्टीलायझर, शोध ॲडव्हॅनटेक औरंगाबाद, दिशा सर्व्हिसेस औरंगाबाद, सिट्रस प्रोसेसिंग इंडिया लि. कंपनीत विविध पदांसाठी सेवेची संधी मिळणार आहे. कंपनीच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जाणार आहे. मेळाव्यास येतांना आधार कार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, दहावी टिसी / सनद, जातीचा दाखल (असल्यास) यांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात. यावेळी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना व अण्णासाहेब पाटील बीज भांडवल योजना विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे ( दुरध्वनी 02462- 251674 ) संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
000000


No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...