Thursday, August 3, 2017

नवीन मतदार नोंदणीसाठी
31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
           नांदेड दि. 3 :- भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानूसार जिल्‍हयातील तरुण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21) नाव नोंदणी करण्यासाठी जिल्‍हयात विशेष मोहिम जुलै महिन्यात राबविण्‍यात आली होती. या विशेष मोहिमेस भारत निवडणूक आयोगाने दिनांक 31 ऑगस्ट 2017 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्‍हयातील जास्‍तीतजास्‍त नागरीकांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवून या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.   
दिनांक 1 जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्‍या नवीन पात्र मतदारांना नोंदणीसाठी अर्ज करता येतील. जिल्‍हयातील मतदारांची नोंदणी, वगळणी, व दुरूस्‍तीसाठीचे अर्ज दिनांक 31 ऑगस्ट  2017 स्विकारण्‍यात येतील. अर्ज नागरीकांनी आपल्‍या भागातील बीएलओ यांचेकडे अथवा संबंधित तहसील कार्यालयात जमा करावेत.
या विशेष मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी  (बीएलओ) हे त्‍यांच्‍या क्षेत्रातील घरांना दिनांक 31 ऑगस्ट 2017 पर्यंत भेट देतील आणि मतदारांची नोंदणी करतील, तसेच मयत / दुबार / स्‍थलांतरीत मतदारांची माहिती घेऊन योग्‍य चौकशीनंतर अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्‍याबाबतची कार्यवाही करण्‍याबाबतचा अहवाल संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे  देतील. 
दिनांक 5 जानेवारी 2017 नंतर नोंदणी करण्‍यात आलेल्‍या तसेच दुरूस्‍ती करण्‍यात आलेल्‍या मतदारांना त्‍या-त्‍या बीएलओ मार्फत विनामूल्‍य PVC EPIC CARD  ( प्‍लास्‍टीक मतदान ओळखपत्र ) वितरीत करण्‍यात येत आहेत याचा नागरीकांनी लाभ घ्‍यावा.  याशिवाय ज्‍या मतदारांचे फोटो यादीत नाहीत त्‍यांनी अलीकडील काळातील रंगीत पासपोर्ट साईज फोटो जमा करावेत. तसेच आपल्‍या कुटूंबातील मयत मतदार असल्‍यास त्‍यांचे नाव वगळण्‍यासाठी नमूना नं. 7 मध्‍ये अर्ज सादर करावेत. याशिवाय दुबार मतदार व स्‍थलांतरीत मतदारांची नावे देखील वगळण्‍यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2017 पर्यंत अर्ज स्विकारले जातील याची सर्वांनी नोंद घ्‍यावी, असेही आवाहन केले आहे.   
000000

No comments:

Post a Comment

निवडणुकीच्या लगबगीत माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे नांदेड लोकसभापोटनिवडणुकीत निवडणूक ...