Monday, July 10, 2017

  दोन कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबीत  
नांदेड, दि. 10 :- किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील मे. धनेश कृषि भांडार व मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी कैलास कृषि सेवा केंद्र या खत विक्री केंद्राने बियाणे व खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याने  त्यांचा परवाना कृषि विभागाकडून निलंबित करण्यात आला.
किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील मे. धनेश कृषि भांडार येथे तालुका भरारी पथकाने विक्री केंद्रास भेट दे तपासणी करुन अहवाल दिला होता. या बियाणे विक्री केंद्रात हा. कॉटन RR-333 बनावट बियाणे आढळून आले. या प्रकरणी पोलीस स्टेशन इस्लापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बियाणे विक्री केंद्राकडून बियाणे नियंत्रण आदेशाचे उल्लंघन झाल्याने बियाणे परवाना निलंबित करण्यात आला आहे.
मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी कैलास कृषि सेवा केंद्र या खत विक्री केंद्राची तपासणी केली असता कच्ची पावती देवून जादा दराने खत विक्री केल्याचे आढळून आले. तसेच अभिलेख अदयावत ठेवली नव्हती. कच्ची पावती देवून खत विक्री केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन मुक्रामाबाद येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  या खत विक्री केंद्राकडून खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन झाल्याने रासायनिक खत परवाना निलंब करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे, खते किटकनाशकांच्याबाबतीत तक्रारीसाठी प्रत्यक्ष, दुरध्वनी, -मेल एसएमएसद्वारे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 (02462) 230123 तसेच भरारी पथकाचे फ्लेक्स वरील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकरी पंडीतराव मोरे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...