Tuesday, July 18, 2017

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत
विविध घटकासाठी 31 जुलै पर्यंत नोंदणी  
शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे कृषि विभागाचे आवाहन    
नांदेड, दि. 18 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2017-18 करिता नांदेड जिल्ह्यासाठी रुपये 222.12 लाखाचा आराखडा मंजुर झाला आहे. या योजनेतील विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर सोमवार 31 जुलै 2017 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
जिल्हा अभियान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती बैठकीत प्राप्त उद्दीष्टाच्या अधीन राहुन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी सोमवार 31 जुलै पर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करुन स्कीम फाईल करावी. इच्छुकांनी प्रत्येक बाबीसाठी स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्यास अडचण आल्यास तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साध अर्ज भरावा.
या योजनेंतर्गत अनुसुचीत जातीसाठी 58.70 लाख रुपये, अनुसुचीत जमाती- 33.37 लाख रुपये सर्वसाधारण- 130.86 लाख रुपये अनुदान याप्रमाणे आर्थिक कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत क्षेत्रविस्तार (आंबा घनलागवड, पेरु घनलागवड), पुष्पोत्पादन (सुटीफुले, कंदफुले, कटफुले), सामुहीक शेततळे, यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर 20 एच.पी. पर्यंत), हरीतगृह, हरीतगृहातील भाजीपाला लागवड, शेडनेट, शेडनेट मधील फुले लागवड, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रीया केंद्र, कांदाचाळ, रायपनींग चेंबर, कोल्ड स्टोरेज, मोबाईल प्रिकुलींग युनिट आदी बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण प्रकल्प राबविण्यासाठी नांदेड जिल्ह्याला 27.91 लाख रुपयाचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या प्रकल्पांतर्गत ट्रॅक्टर (20 अश्वशक्ती पर्यंत), पॉवर टिलर (8 अश्वशक्ती पेक्षा कमी), पॉवर टिलर (8 अश्वशक्ती पेक्षा जास्त), 20 एच.पी. पर्यंत ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलीत अवजारे (नांगर, डिस्क नांगर, कल्टीव्हेटर, लेव्हलर ब्लेड, रिजर, पेरणी यंत्र त्यादी) या बाबींचा समावेश आहे. अधीक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...