पीओएस मशिनद्वारे जिल्हयात खत
विक्रीस सुरुवात
नांदेड दि. 2 :- अनुदानीत रासायनिक खताची विक्री विक्रेत्यांनी 1 जूनपासून
पीओएस मशिनवरच करावी. अनुदानीत
खतासाठी थेट हस्तांतरणाच्या प्रक्रियेला
1 जून पासून सुरुवात होत
असल्याने पीओएस मशिनचा वापर
सुरु करुन हा प्रकल्प
यशस्वी करावा, असे आवाहन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अशोक शिनगारे यांनी
केले.
गुरुवार 1 जून 2017 रोजी
मे. कैलास फर्टीलायझर नवा
मोंढा नांदेड येथे मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे, माजी
आमदार माधवराव पाटील जवळगावकर, कृषि
व पशुसंवर्धन समितीचे
सभापती दत्तात्रय रेड्डी, अति. मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ.
सुधीर भातलवंडे, कृषि विकास
अधिकारी पंडीत मोरे, सहाय्यक
प्रकल्प अधिकारी श्री.
घुले, मोहीम अधिकारी आनंत
हांडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक नितीन देशपांडे तसेच अखिल
भारतीय बियाणे, खते, औषधी विक्रेता
असोशिएशन दिल्लीचे सचिव सुरेंद्रसिंग
बिरीवाला यांचे उपस्थितीत ई-पॉश
मशिनद्वारे रासायनिक खताची प्रत्यक्ष
विक्री शेतकऱ्यांना करण्यात
आली.
त्याचप्रमाणे नायगाव
येथे आमदार वसंतरावजी चव्हाण, हिमायतनगर
येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती
शांताबाई पवार जवळगावकर, धर्माबाद येथे
जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन
समितीचे सभापती दत्तात्रय रेड्डी, बिलोली येथे
जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. ठक्करवाड, भोकर
येथे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रावणगावकर, भोकर मार्केट कमिटी सभापती
जगदिश पाटील, अर्धापूर येथे
जि.प.सदस्या सौ. संगिता
अटकोरे, माजी उपसभापती सुनिल अटकोरे, बारड
येथे प्रगतशिल शेतकरी शिवाजीराव
देशमुख यांच्या उपस्थितीत तसेच इतर
सर्व तालुक्यातही मान्यवराच्या
उपस्थितीत पीओएस
मशिनद्वारे
रासायनिक खताची प्रत्यक्ष विक्री
शेतकऱ्यांना करण्यात आली.
जिल्हयात मागील
तीन महिन्यापासून विविध
बैठका व प्रशिक्षण घेऊन
खत विक्रेत्यांना मार्गदर्शन
करण्यात आले होते. तसेच
पीओएस मशिनद्वारे रासायनिक
खताची विक्री कशी करावी
याबाबत खतकंपनी प्रतिनिधी यांचे
सहकार्याने पीओएस मशिन वापराबाबत
सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले
होते.
यावेळी जिल्हा
कृषिनिविष्ठा संघटनेचे अध्यक्ष मधुकर
मामडे, शिवशंकर पुरमवार, इफको खत कंपनी
प्रतिनिधी श्री. घाडगे, व खत विक्रेते, शेतकरी
आदी उपस्थित होते. बैठक
यशस्वी करण्यासाठी मोहीम अधिकारी
आनंत हांडे, कृषि
अधिकारी डी. के.
जाधव, व्ही. आर. सरदेशपांडे
यांनी परिश्रम घेतले
00000
No comments:
Post a Comment