Monday, June 5, 2017

'आपले सरकार' पोर्टलवरील तक्रारींचे
त्वरीत निराकरण करा- अप्पर जिल्हाधिकारी पाटील
नांदेड, दि. 5 :-   'आपले सरकार' पोर्टल अधिकाऱ्यांनी नियमित पहावे, व त्यावर दाखल तक्रारींचे त्वरीत निराकरण करावे, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय लोकशाही दिन आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होत. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे बैठक संपन्न झाली.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, कार्यकारी अभियंता लघू सिंचन व्ही. पी. शाहू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, प्र.उपवनसरंक्षक डी. एस. पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक डॅा. पी. पी. घुले, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भगवान वीर, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर आदींची उपस्थिती होती.
बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. पाटील म्हणाले की, आपले सरकार या प्रणालीत दाखल तक्रारींचे अधिकाऱ्यांनी नियमित संनियंत्रण करावे. दाखल तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करून, त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्यामुळे या तक्रारी पुढे प्रलंबित दिसणार नाहीत. लोकशाही दिनामध्ये दाखल तक्रारी त्वरीत निकाली काढाव्यात. नागरिकांना तक्रारीसाठी सातत्याने लोकशाही दिनामध्ये यावे लागू नये. असेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आगामी चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेबाबत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात चार लाख 76 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट आहे. यासाठी जागा निश्चिती, वेळेत खड्डे खोदणे तसेच रोपांची उपलब्ध आदी नियोजनाबाबत माहिती घेण्यात आली. तत्पुर्वी लोकशाही दिनामध्ये दाखल तक्रारी, निवेदनांवर नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा व संबंधीत यंत्रणांना अनुषांगीक कार्यवाहीबाबत निर्देशीत कऱण्यात आले.  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...