Thursday, June 1, 2017


अंत्योदयाची संकल्पना सर्वसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी 
प्रतोदचा विशेषांक महत्त्वपुर्ण -अर्थमंत्री मुनगंटीवार

नांदेड दि. 1 :- पंडित दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदय ही संकल्पना आता आंतरराष्ट्रीयस्तरावर स्विकारली जाते आहे. त्यादृष्टीने पंडित उपाध्याय यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रतोदचा विशेषांक महत्त्वपुर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. येथील साप्ताहिक प्रतोद या नियतकालिकाच्या एकात्मयोगी पं. दीनदयाल उपाध्याय या विशेषाकांचे प्रकाशन अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रा.स्व. संघाचे पश्चिम सेवा प्रमुख उपेंद्रभाऊ कुलकर्णी होते. लिला बँक्वेट हॅाल येथे कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावार प्रतोदचे संपादक अमोल अंबेकर, विशेषांकाचे अतिथी संपादक सनतकूमार महाजन, ॲड. प्रितेश पाटणे यांची उपस्थिती होती.
अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानवतावादाचा पुरस्कार केला. त्यांनी मी पासून आम्हीपर्यंतचा पोहचावे यासाठी विचार केला. आज एकविसाव्या शतकात मात्र उलटा म्हणजे आम्ही पासून मी पर्यंतचा प्रवास सुरु झाला आहे. विश्र्वातील पंचेचाळीस पैकी चव्वेचाळीस संस्कृती नष्ट झाल्या. पण भारतीय संस्कृती टिकली, कारण त्यासाठी संत, महंतानी प्रयत्न केले. संयुक्त राष्ट्र संघटनेनेही आता समृद्धीचे निकष बदलले आहेत. त्यामध्ये समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा विचार केला आहे. त्यादृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदय आज समयोचित ठरतो. त्यामुळेच अंत्योदयाचा विचार पोहचविण्यासाठी अशा विशेषांकाद्वारे प्रयत्न केले जात आहेत, हे महत्त्वपुर्ण आहे, असेही ते म्हणाले.

सुरवातीला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले. विशेषांकाचे अतिथी संपादक श्री. महाजन, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कुलकर्णी यांचीही समयोजित भाषणे झाले. ॲड. पाटणे यांनी सुत्रसंचालन केले. प्रतोदचे संपादक श्री. अंबेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...