Friday, March 31, 2017

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांच्या
फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी उपक्रमाचे उद्घाटन
जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते वाहने मार्गस्थ

नांदेड दि. 31 :- विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देणासाठी फिरत्या वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीच्या उपक्रमाचे आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तसेच या वाहनांना मार्गस्थ करण्यात आले. ही दोन वाहने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून वाहने उद्घाटनानंतर जिल्हा दौऱ्यासाठी मार्गस्थ करण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, समतादूत प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्पाधिकारी मुंजाजी कांबळे, समतादूत अविनाश जोंधळे, विनोद पाचंगे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, माहिती अधिकारी निशिकांत तोडकर आदींची उपस्थिती होती.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती या फिरत्या वाहनाद्वारे जिल्ह्यातील गावात पोहचविण्याचा प्रयत्न आहेत. वाहनांवरील श्राव्य ( ऑडियो ) ध्वनीफितीद्वारे योजनांची माहिती असणाऱ्या जींगल्स ऐकविण्यात येणार आहेत. गावा-गावात पोहचून  विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचीत जातींसाठीच्या विद्यार्थी, तरूण तसेच महिला, शेतकरी आदी घटकांसाठीच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, विविध प्रकारची प्रशिक्षणे, महिला सक्षमीकरण, लाभार्थी व समूह योजनांची माहिती पोहचविण्याचा उद्देश आहे. या वाहनांना जिल्ह्यातील आठ-आठ तालुक्यांची विभागणी करून देण्यात आली असून, त्यासाठीचा मार्गही निश्चित करण्यात आला आहे. या उपक्रमात समतादूतही सहभागी होणार आहेत.
          
  जिल्हा माहिती अधिकारी गवळी यांनी फिरत्या वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीबाबतची संकल्पना विशद केली. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते फित कापून वाहनांचे उद्घाटन करण्यात आले व वाहनांना मार्गस्थ करण्यात आले. याप्रसंगी किसान बिरादरीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव पाटील- इजळीकर, गुंडेगावचे दासराव हंबर्डे आदींचीही उपस्थिती होती.

0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...