Wednesday, March 22, 2017

कॅशलेस व्यवहारांच्या प्रोत्साहनासाठी शुक्रवारी 
डिजीधन मेळावा, विविध घटकांचा सहभाग
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार
नांदेड दि. 22 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेत शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी डिजीधन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात हा मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर अध्यक्षस्थानी आणि राज्याचे गृह (शहरे), नगरविकास, विधी आणि न्याय विभाग, संसदीय कार्ये, कौशल्य विकास आणि उद्योजकता माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री डॅा. रणजित पाटील प्रमुख उपस्थित राहतील. रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांना चालना मिळावा यासाठी आयोजित या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे केले. डिजीधन मेळाव्याच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत देण्यात आलेली माहिती अशी, मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी होणार आहेत. त्यासाठी सुमारे 63 अधिक दालनांची उभारणी करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मेळाव्याचे  उद्घाटन होईल. दुपारच्या सत्रात साडे तीन वाजता नियोजन भवन सभागृहात मुख्य कार्यक्रम होईल. याप्रसंगी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील. वस्त्रोद्योग, पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर अध्यक्षस्थानी आणि राज्याचे गृह (शहरे), नगरविकास, विधी आणि न्याय विभाग, संसदीय कार्ये, कौशल्य विकास आणि उद्योजकता माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री डॅा. रणजित पाटील प्रमुख उपस्थित राहतील. तसेच जिल्हा परीषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार राजीव सातव, खासदार डॅा. सुनिल गायकवाड, महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमरनाथ राजूरकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे, डी. पी. सावंत, वसंतराव चव्हाण, प्रदीप नाईक, सुभाष साबणे, प्रताप पाटील-चिखलीकर, हेमंत पाटील, नागेश पाटील-आष्टीकर, डॅा. तुषार राठोड, श्रीमती अमिताताई चव्हाण आणि राज्याच्या माहिती तंत्रज्ज्ञान विभागाचे व्ही. के. गौतम यांचाही निमंत्रितामध्ये समावेश आहे.  या कार्यक्रमात  कॅशलेस व्यवहार करणाऱ्या ग्राहक तसेच व्यापारी-व्यावसायीकांतून भाग्यवान विजेत्याची (लकी ड्रॅा) काढण्यात येणार आहे.
 मेळाव्यात बँका, आधार क्रमांकाशी निगडीत पेमेंट, तसेच मोबाईल कंपन्या, खते, इंधन आदी कंपन्याही सहभागी होणार आहेत.  त्यांच्याकडील विविध ॲप व त्यांच्या वापराबाबत याठिकाणी डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके तसेच खरेदी आदीबाबत माहिती दिली जाणार आहे.
मेळाव्याची वैशिष्ट्ये –
  • मराठवाड्यात नांदेड जिल्ह्या डिजीधन मेळाव्याच्या आयोजनाचा मान.
  • रुपेकार्डद्वारे, आधार कार्डद्वारे, तसेच युपीआय (विविध अॅप्स) भीम अॅप, तसेच साध्या मोबाईद्वारेही (युएसएसआयडी) जास्तीत जास्त व्यवहार व्हावेत यासाठी, विविध घटकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मेळाव्याचे आयोजन. सुमारे 63 दालनांचा समावेश असेल. ज्यामध्ये विविध शासकीय कार्यालये, मोबाईल कंपन्या, विविध बँका. याशिवाय कॅशलेस व्यवहार करणाऱ्या विविध व्यापारी, छोटे व्यावसायीक आदींनाही आवर्जूनही सहभागी करून घेण्यात येत आहे.
  • डिजीधन मेळाव्यात शासकीय विभागांचाही सहभाग. महापालिका, आरटीओ अशा यंत्रणा ई-गव्हर्नन्सद्वारे तसेच डिजीटल पेमेंटबाबतची माहिती देतील.
  • बँका, खासगी पेमेंट संस्था (पेटीएम, एअरटेल पेमेंट बँक, पेवर्ल्ड इ. कंपन्या) सहभागी होतील. या बँका व्यवहारांबाबतची प्रात्यक्षिकेही दाखवतील. प्रत्यक्ष ग्राहक नोंदणीही करतील. खाती सुरु करतील
  • कॅशलेस उपक्रमांची माहिती, संकेतस्‍थळांचे उद्घाटन असे विविध कार्यक्रम. डिजीधन मेळाव्यांच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याने घोषवाक्‍य स्‍पर्धा  तसेच लघु कविता यांचे आयोजन.  नांदेड डिजीधन मेळाव्यासाठी स्वतंत्र वेबपेजचीही निर्मिती.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   91 लघु पाटबंधारे योजनेची सातवी प्रगणना तर जलसाठ्यांच्या दुसऱ्या प्रगणनेचा कार्यक्रम  कार्यरत प्रगणकांची माहिती सादर करण्याचे ...