Friday, March 3, 2017

इसापूर मधून पाणी पाळ्या सोडण्यासाठी
थकीत रक्कम भरण्याचे आवाहन
नांदेड , दि. 3 :- उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजवा कालवा 119 कि.मी. व इसापूर डावा कालावा 84 कि.मी. पर्यंत वितरण व्यवस्थेअंतर्गत उन्हाळी हंगामासाठी पाणी पाळी सोडणे प्रस्तावित आहे. तथापि त्यापुर्वी लाभधारकांनी पाणीपट्टीची थकीत रक्कम तातडीने भरावी, असे आवाहन नांदेड उर्ध्व पैनगंगा प्रकल्प यांच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाने केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सन 2016-17 मध्ये तीन आवर्तने मार्च ते जून 2017 दरम्यान लाभधारकांच्या मागणीनुसार देणे प्रस्तावित होते. परंतू लाभधारकाकडील थकीत रक्कम व अग्रीम पाणीपट्टीच्या रक्कमेबाबत मागणी करुनही शाखा कार्यालयात भरणा करण्यात येत नाही. त्यामुळे उन्हाळी हंगाम सन 2016-17 राबविण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
लाभधारकांनी मागील थकबाकीच्या 1 / 3 व चालू हंगामाची 50 टक्के अग्रीम रक्कम संबंधीत शाखा कार्यालयास भरणा करुन रितसर पावती घ्यावी. यातून शासन महसुलात वाढ होण्याच्यादृष्टिने जलसंपदा विभागास सहकार्य करावे. अन्यथा उन्हाळी हंगाम सन 2016-17 मध्ये पाणी सोडता येणे शक्य होणार नाही, याची लाभधारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन नांदेड उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...