Wednesday, February 8, 2017

तंबाखु सेवनाच्या सवयीपासून दूर
 राहण्याचा संकल्प करावा - डॉ. गुंटूरकर
नांदेड दि. 8 :- तंबाखचे व्यसन ही एक वाईट सवय आहे. तंबाखुचे सेवन करणे हे स्वत:सह इतरांच्या आजारासाठीही खूप घातक आहे. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने तंबाखूसारख्या निकोटीनयुक्त पदार्थाचे सेवन करू नये. अशा वाईट सवयीपासून दूर राहण्याचा संकल्प करावा, असे आवाहन  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी केले.
कर्करोग दिन व पंधरवाडा 4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2017  या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आज श्री गुरुगोबिंदसिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालयातील सर्जिकल हॉल येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गुंटूरकर हे बोलत होते.
डॉ. गुंटूरकर पुढे म्हणाले की , तंबाखू या निकोटीन युक्त पदार्थाचे सेवन हे कर्करोगाचे मुख्य कारण आहे. भारतात दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे जवळपास दहा लक्ष व्यक्तीचा मृत्यु होतो. त्याचबरोबर नवीन पिढी मोठ्या प्रमाणात याच्या आहारी गेल्याचे दिसून येते असे सांगितले. त्यामुळे तंबाखच्या कोणत्याही प्रकारच्या सेवनामुळे केवळ कर्करोग हा एकमेव आजार कारणीभूत  नाही. त्यापासून हृदयरोग, फुफुसाचे आजार, पोटाचे विकार अशा विविध आजार उद्भवण्याची  शक्यता असते.
कार्यक्रमास डॉ. डी. एन.हजारी, डॉ. सौ. लातूरकर डॉ.एच.के. साखरे डॉ.रोशनी चव्हाण (दंतशल्यचिकित्सक) डॉ.पवार, डॉ.बोरसे आदी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नर्सिंग स्कूल येथील विद्यार्थी सहभागी होते.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...