Thursday, February 9, 2017

कर्करोग दिन व पंधरवड्यानिमित्त
जिल्हा कारागृहात शिबीर संपन्न
नांदेड दि. 9 :-  कर्करोग दिन व पंधरवाडा 4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2017 या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आज श्री गुरुगोबिंद सिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय नांदेड व समता मेमोरिअल फाऊनडेशन  यांच्यावतीने जिल्हा कारागृह नांदेड येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रम व सर्व रोगनिदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय डॉ. डी. एन. हजारी हे होते.  
डॉ. हजारी यांनी तंबाखू हे मानवी आरोग्यास कसा घातक आहे याबद्दल कैद्यांना सोप्या शब्दात माहिती दिली. दंत शल्याचिकित्सक  डॉ. रोशनी चव्हाण यांनी उपस्थित कैद्यांना तंबाखू सारख्या निकोटीनयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे कॅन्सरसह होणाऱ्या विविध आजाराची माहिती दिली.
यावेळी उपस्थित कैदी तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात 70  रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७.१ टक्के रुग्ण उच्चरक्तदाब व ७.१ टक्के मधुमेहाचे उपचार घेत असल्याची दिसून आली. तसेच ८ टक्के नवीन रुग्ण उच्चरक्तदाबासाठी निदान झाली. त्याचबरोबर ६१.४२ टक्के रुग्णांच्या त्वचेच व  १२.८५ टक्के रुग्णांची मुख आरोग्यासाठी तपासणी करण्यात आली.
शिबिरास डॉ. एच.आर साखरे, कारागृह अधीक्षक श्री. चव्हाण,  डॉ. रोशनी चव्हाण, डॉ. बोरसे डी. पी., सामुपदेशक सुवर्णकार सदाशिव, अधिपरिचारिका सारिका तथोडे व समता मेमोरिअल फाऊनडेसेन ऑफिसर शिवशंकर गव्हाणे उपस्थित होते.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...