Wednesday, February 22, 2017

जि.प.,पं.स. निवडणकीची आज मतमोजणी, यंत्रणेची जय्यत तयारी

जि.प.,पं.स. निवडणकीची आज
मतमोजणी, यंत्रणेची जय्यत तयारी
नांदेड दि. 22 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी उद्या गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी होणार आहे.  त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. मतमोजणीसाठी संबंधित ठिकाणी पुर्ण सज्जता ठेवण्यात आली आहे. यासाठीची प्रशिक्षणेही यापुर्वीच पुर्ण करण्यात आली आहेत. मतमोजणी सुरळीत पार पडावी, व जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी पोलीस प्रशासनानेही पुरेश्या बंदोबस्तासह विविध उपाययोजना केल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी दहा वाजल्यापासून सुरु होईल. सुरवातीला टपाली मतदानाची मोजणी करण्यात येईल. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि स्थानिक यंत्रणेने सुनिश्चित केल्याप्रमाणे फेऱ्यानिहाय टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सुक्ष्मनियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार एक गट व त्यातील संबंधित गणांची मतमोजणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी सांगितले आहे. जिल्हापरिषदेच्या 63 गटांसाठी 374 आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मतमोजणीसाठी तालुकानिहाय निश्चित करण्यात आलेली टेबल व मतमोजणीसाठीच्या फेऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे (पहिल्या कंसात मतदान केंद्रांची संख्या माहूर (83) - टेबल 12, फेऱ्या 16. किनवट (  191) - टेबल 24, फेऱ्या 17.  हिमायतनगर (67) – टेबल 12, फेऱ्या 12 . हदगाव (209) – टेबल 14, फेऱ्या 30.  अर्धापूर (62) – टेबल 8, फेऱ्या 16, नांदेड (138) – टेबल 16, फेऱ्या 20. मुदखेड (74)- टेबल 12, फेऱ्या 14. भोकर (97) – टेब्लस 12, फेऱ्या 18.  उमरी (76) – टेब्लस 10, फेऱ्या – 16. धर्माबाद (59) – टेबल 12, फेऱ्या 14.  बिलोली (125) – टेबल 16, फेऱ्या 16. नायगाव- (156) – टेबल 12, फेऱ्या 32. लोहा (191) – टेबल 16, फेऱ्या 26. कंधार (182) – टेबल 18, फेऱ्या 30. मुखेड (236) – टेबल 18, फेऱ्या 30. देगलूर (147) – टेबल 15, फेऱ्या 18. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक आणि एक सहायक अशा रितीने मनुष्यबळाची मतमोजणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी दोन सहायकांचीही मदत घेतली जाणार आहे.
तालुका निहाय जिल्हा परिषद गटासाठीचे उमेदवार पुढील प्रमाणे (कंसात गटांची संख्या) माहूर- 10 (2)  , किनवट-  48 (6) , हिमायतनगर  13 (2). हदगाव- 45 (6) , अर्धापूर- 12 (2) , नांदेड- 34 (4) , मुदखेड- 7 (2) , भोकर- 16 (3) , उमरी- 9 (2), धर्माबाद- 12 (2) , बिलोली- 26 (4)  , नायगाव- 21 (4) , लोहा- 28 (6) , कंधार-  29 (6), मुखेड- 33 (7) , देगलूर- 31 (5). अशारितीने जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी 374 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.तालुका निहाय पंचायत समिती गणांसाठीचे उमेदवार पुढील प्रमाणे (कंसात गणांची संख्या) माहूर- 24 (4)  , किनवट-  73(12) , हिमायतनगर  16 (4). हदगाव- 54  (12) , अर्धापूर- 20 (4) , नांदेड- 43 (8) , मुदखेड- 17 (4) , भोकर- 31 (6) , उमरी- 22 (4), धर्माबाद- 20 (4) , बिलोली- 36 (8)  , नायगाव- 39 (8) , लोहा- 57 (12) , कंधार-  56 (12), मुखेड- 56 (14) , देगलूर- 39 (10). अशा रितीने पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...