Monday, February 6, 2017

अर्थशास्त्रावरील कोळंबे यांच्या
व्याख्यानास उत्स्फुर्त प्रतिसाद 
नांदेड, दि. 6 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, जिल्हा ग्रंथालय धिकारी यांच्यावतीने उज्ज्वल नांदेड माहिमेअतंर्गत रविवार 5 फेब्रुवारी 2017 रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे असे पुणे येथील अर्थशास्त्राचे व्याख्याते रजंन कोळंबे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. या व्याख्यानासाठी होतकरु विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली.

व्याख्यानात श्री. कोळंबे यांनी स्पर्धा परीक्षमधील अर्थशास्त्राचे महत्व या विषयातील महत्वाच्या अभ्यासाच्याबाबी, परीक्षेतील प्रश्नांचे स्वरुप, उत्तराची पध्दत एकूणच स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी अभ्यासाची तयारी याविषयीही मार्गदर्शन केले.
शिबिराचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. ते म्हणाले की,  विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करताना कोणताही मनात न्यूनगंड बाळगता सक्षमपणे परीक्षांना सामोरे जावे. प्रशासन विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्ध आहे.
व्याख्याते रंजन कोळंबे त्यांच्या पत्नी पूनम कोळंबे यांचे ग्रामगीता देऊन स्वागत करण्यात आले. राज्यातून प्रथम क्रमांकाने सहायक कक्ष अधिकारी या पदासाठी निवड झालेल्या अश्विनी अर्जूनराव पोतलवार याचा यावेळी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
व्याख्यानासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. सभागृह तुंड भरल्यानतर सभागृहा बाहेर एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक विद्यार्थी झाडाखाली, जिकडे जागा मिळेल तिकडे दानामध्ये उभे राह, बसून  व्याख्यान ऐकत होते. मनपाच्या सहायक आयुक्त माधवी मारकड, उमरी-धर्माबादच्या मुख्याधिकारी अंधारे, नायगावच्या मुख्याधिकारी टोंगे यांच्यासह इतरही अधिकारी ज्यांना कोळंबे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे तेही आवर्जून उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन भार  जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मीना सोलापूरे, आरती कोकूलवार, संजय कर्वे, प्रताप सुर्यंवशी, अजय वटमवार, कोंडिबा गाडेवाड, विठ्ठ यनगुलवार, बाळू पावडे, रघुवीर श्रीरामवार, शहादत्त पुयड, अभीजीत पवार, नितीन कसबे, सतपाल सिंग, लक्ष्मण सेनेवाड, ज्ञानेश्वर सेनेवाड, सोपान यनगुलवार आदींने सहकार्य केले.

000000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...