जवळगाव जि. प. हास्कुलच्या मिना वाघमारेस
राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेत पारितोषिक

कु. मिना वाघमारे हिच्या यशासाठी आज प्रजासत्ताक दिनी
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते
पारितोषिक देवून गौरविण्यात आले. यावेळी पीसीआरएचे सहसंचालक योगेश जोशी, मिनाचे
शिक्षक बाळासाहेब गुंड तसेच आई , वडील गणेश वाघमारे उपस्थित होते. मिना वाघमारे
जवळगावच्या जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकते. तिने
पर्यावरण आणि आरोग्य रक्षणासाठी इंधन वाचवा या विषयावर निबंध सादर केला होता. स्पर्धेत
तिला राष्ट्रीय स्तरावरील मराठी भाषेतील निबंधासाठी तिसरा क्रमांक मिळाला आहे.
पारितोषिक म्हणून तिने प्रशिस्तीपत्रासह लॅपटॉपचे बक्षिस पटकाविले आहे. या यशासाठी
तिचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
00000000
No comments:
Post a Comment