नागरिकांना कॅशलेस व्यवहारासंबंधी
शासकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे
-
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी

नोटाबंदीमुळे नागरिकांना
आर्थिक अडचणी जाणवत आहेत. डिजीटल पेमेंटद्वारे यातून मार्ग निघू शकतो. शासकीय
अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या दैनंदिन व्यवहारात कॅशलेस व्यवहाराचा वापर करावा.
सामान्य नागरिकांनाही त्याचे मार्गदर्शन करावे. कार्यालय प्रमुखांनी आपल्या
कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांनाही कॅशलेस व्यवहारासंबंधी माहिती
व प्रशिक्षण दयावे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठीही प्रशिक्षण आयोजित
केले आहे, असेही जिल्हाधिकारी श्री.
काकाणी यांनी सांगितले.
कॅशलेस व्यवहारासाठी
मोबाईल ॲप, प्रिपेड कार्ड, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, ई-वॉलेट यासारख्या
सुविधांबरोबर अविस्तृत पुरक सेवा माहिती (USSD) या प्रणालीद्वारे कोणत्याही मोबाईल
फोनच्या इंटरफेसमधून इंटरनेटशिवाय पैसे पाठविणे शक्य आहे. या सर्व सुविधांच्या
महत्वाबाबत लहान व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे.
त्यासाठी जिल्ह्यात वित्तीय संस्था व बँकांच्या माध्यमातून बाजार समित्या, आठवडी
बाजार, मोठी आस्थापना, कार्यालय, बँका, मोंढा आदी ठिकाणी प्रशिक्षण वर्ग हाती
घेण्यात आले आहे.
शहरी भागाबरोबर ग्रामीण
भागात कॅशलेस व्यवहार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले
जात आहे. बँकांनीही काही महत्वाची गावे कॅशलेस करण्याचे उद्दीष्ट ठेवून कार्यवाही
करावी. कॅशलेस व्यवहार अधिकाधिक व्हावेत , डिजीटल व्यवहार व्हावेत यासाठी विविध
घटकांच्या माध्यमातून प्रशिक्षणाबरोबर जनजागृतीही करण्यात येणार आहे. यामुळे
डिजीटल व्यवहाराची व्याप्ती वाढेल. रोखीने आर्थिक व्यवहाराचे प्रमाण कमी होईल. त्याद्वारे
व्यवहारात पारदर्शकता आणणे सहज शक्य आहे. म्हणून नागरिकांनी यापद्धतीचा अवलंब करुन
अधिकाधिक डिजीटल व्यवहार करावे , असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी
केले आहे.
000000
No comments:
Post a Comment