फुले
विकास महामंडळाकडून व्यवसाय प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले
नांदेड दि. 18 :- महात्मा
फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील सुशिक्षित
बेरोजगार उमेदवाराकरीता तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्याकरीता विविध व्यवसायाचे
शासनमान्य संस्था आयटीआय मार्फत प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी महामंडळाच्या
कार्यालयाकडे बुधवार 31 नोव्हेंबर 2016
पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापक यांनी केले आहे.
सन
2016-17 या वर्षासाठी संगणक, ब्युटीपार्लर, इलेक्ट्रीशियन, शिवणकला, मोटार
वायरींग, वाहन चालक, नळजोडणी, ॲटोमोबाईल रिपेरिंग इ. प्रशिक्षणासाठी अर्ज
मागविण्यात येत आहेत. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, उत्पन्न, राशनकार्ड, शाळा
सोडल्याचा दाखला शैक्षणिक प्रमाणपत्र व छायाचित्रे लावून जिल्हा व्यवस्थापक
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यालय , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे यात 31 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत
, असेही आवाहन केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment